Raj Thackeray: मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात “राज”गर्जना, लवकरच पक्षात आचारसंहिता लागू करणार

Raj Thackeray Latest News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण केल्याचे पाहायला मिळते, तसेच “लहान पणापासून मी अनेक पराभव पाहिले….”
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज पुन्हा ठाकरे शैलित भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. राज ठाकरे यांनी आज पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर भाष्य केले आहे. वरळीतील दोन सभागृह येथे आयोजित असलेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चांगलीच फटकेबाजी केली आहे. पक्षांमध्ये शिस्त लागण्याकरिता राज ठाकरे लवकरच पक्षांमध्ये आचारसंहिता लागू करणार आहे. या आचारसंहितेमध्ये पक्षात काय चालले आहे हे वरपासून खालपर्यंत म्हणजे शाखाप्रमुख पासून ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कळालेच पाहिजे. त्यामुळे काही पदाची नावे देखील बदलली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने तुमच्यासमोर हे सर्व मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
राज ठाकरे भाषणामध्ये लहानपणापासून मी अनेक पर्व पाहिले आहेत तसेच अनेक विजय देखील पाहिले आहे पराभवनी खचलो नाही आणि विजयाने हरखून गेलो नाही. कसलेल्या पिचलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम राहा अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य भरवले आहे. जे आपल्या महाराष्ट्राचे करायचे आहे ते महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रातील हिंदूंसाठी करणार आहे असे राज ठाकरे यांनीही म्हटले आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका अद्यापही लागणार नाही असे राज ठाकरे यांनी भाकीत केले आहे. कारण निवडणुकीच्या याचिकेवरील सुनावणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून त्यामुळे ते याचिकेतून काही निकाल लागेल असे काही दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मेळावे, कार्यक्रम, यात्रा, कार्यक्रम घेऊ नये आत्ताच खर्च कराल तर निवडणुकीच्या दरम्यान खिसे रिकामी करून माझ्यासमोर उभे राहिला अशी कोपरखैळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लगावली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दाखला देताना राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव देखील शंका उपस्थित करत आहे. सात वेळा विजय झालेले बाळासाहेब थोरात एकदाच्या निवडणुकीत आठव्यांदा विजय होणार होते. त्यांनी आत्तापर्यंत सातवी वेळा 50 ते 80 हजार चे मताधिक्य घेऊन विजय झाला आहे त्यामुळे त्यांचा दहा हजार मतांनी पराभव होणे हा देखील शंकेचा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच, ज्या शरद पवार यांच्या जीवावर आजपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ राजकारण करत आले. त्या शरद पवार यांना केवळ दहा जागा मिळतात? हे न समजण्याची गोष्ट असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. चार महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले आहेत. एका खासदारांच्या अंतर्गत सहा आमदार निवडून येतात. मात्र सर्वांच्या सर्व नाही पकडले तरी देखील आमदारांची संख्या वाढायला हवी होती. मात्र त्यांचे केवळ 15 आमदार निवडून येतात? यावर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांचे आठ खासदार निवडून आले होते. त्यांचे केवळ दहा आमदार निवडून येतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या लोकसभेत अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतो. त्या अजित पवार यांचे 42 आमदार कसे निवडून आले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र हे का झाले? कशामुळे झाले? हा संशोधनाचा विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.