
Raj Thackeray On Prafull Patel : मराठमोळ्या मातीतील पक्षाचे नेतृत्व मराठीच असावे; राज ठाकरेंनी पुन्हा एकदा फुंकले ‘मराठी अस्मिते’चे रणशिंग
मुंबई | अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केवळ राजकीय परिस्थितीवर टीका केली नाही, तर राष्ट्रवादीच्या भविष्यातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून ‘मराठी कार्ड’ खेळले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमके काय म्हटले?
राज ठाकरे यांनी राजकारणाच्या खालावलेल्या स्तरावर नाराजी व्यक्त करताना थेट प्रफुल पटेल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे,
“महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे, त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही!”— राज ठाकरे (MNS प्रमुख) अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.



