Raj Thackeray CM Devendra Fadanvis Meet : उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाणारे राज आता भाजपच्या वाटेवर?
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात गुरुवारी (12 जून) सकाळी एक नवीच खळबळ उडाली, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अचानक भेट झाली. Raj Thackeray CM Devendra Fadanvis Meet मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे हे सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)सोबत जाण्याचे संकेत देत असतानाच, त्यांनी भाजप नेते आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र राजकीय समीकरणं बदलण्याच्या शक्यता या भेटीतून अधिकच ठळक होत आहेत.
सत्तास्थापनेपासून फडणवीस-राज ठाकरे यांच्यात वेळोवेळी संवाद झाला आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी समोर आली असताना देखील अशाच प्रकारे दोघांची भेट झाली होती. त्या वेळेची चर्चा गुप्तच ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भेटीकडेही संशयाने पाहिले जात आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे या शहरांमध्ये राज ठाकरे यांची जनतेवर चांगली पकड आहे. त्यामुळे ते स्वतंत्रपणे नाही तर कोणत्यातरी पक्षासोबत युती करून निवडणुकांमध्ये प्रभाव टाकण्यास सक्षम आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…