मुंबई

Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर घेतली भेट

Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at Varsha Bungalow मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निवडणुकीबाबत चर्चा?

मुंबई :- राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली असतानाच राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांना टक्कर देण्यासाठी राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. अशातच स्वबळावर निवडणुकीचा नारा देणारे राज ठाकरे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र निर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा Raj Thackeray Meet Eknath Shinde या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटी मागील काय कारण आहे अद्यापही समोर आले नाही. परंतु राज ठाकरे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी (22 सप्टेंबर) शिवसेना (ठाकरे) युवा सेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या मतदारसंघावर यापूर्वीच मनसेने दावा ठोकला असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तयारीलाही लागले आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Raj Thackeray Meet Eknath Shinde महत्वाची मानली जाते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जर राज ठाकरे महायुतीत सहभागी झाल्यास राज्यात राजकीय वेगळे समीकरण पाहायला मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0