मुंबईठाणे
Trending

Kalyan Titwala Water Cut News : कल्याण-टिटवाळाकरांसाठी महत्त्वाची बातमी! मंगळवारी 12 तास पाणीपुरवठा बंद

Kalyan water supply Cut News : मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

कल्याण :- कल्याण आणि टिटवाळा शहरांतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या KDMC पाणीपुरवठा विभागाने येत्या मंगळवारी, 11 नोव्हेंबर 2025 रोजी शहरांचा पाणीपुरवठा बारा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत. Kalyan Latest News

पाणीपुरवठा बंदची वेळ: मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.

दुरुस्तीचे ठिकाण आणि कारण: कल्याण आणि टिटवाळा शहर परिसराला उल्हास नदीच्या काठावरील मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या केंद्राच्या यांत्रिक आणि तांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी केली जाणार आहे.

या भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण शहरातील आणि टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील:

कल्याण पूर्व: वालधुनी परिसर.

कल्याण पश्चिम: बिर्ला महाविद्यालय परिसर, उपप्रादेशिक परिवहन विभाग (RTO) परिसर.

टिटवाळा अ प्रभाग: मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली, धाकटे शहाड, शहाड, बंदरपाडा, वडवली परिसर.

नागरिकांना आवाहन: बारा तासांच्या पाणीपुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी संबंधित भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0