Raj Thackeray On Mahayuti Sarkar : जागांच्या आकड्यापेक्षा ‘महाराष्ट्र’ मोठा; राज ठाकरेंकडून शिवसेना (ठाकरे)-मनसे युतीची अधिकृत घोषणा
मुंबई | “कोणताही वाद किंवा भांडणापेक्षा ‘महाराष्ट्र’ मोठा आहे, हीच आमच्या एकत्र येण्यामागची मूळ भावना आहे,” अशा स्पष्ट शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (UBT) सोबतच्या युतीचा पाया स्पष्ट केला. वरळी येथील संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. “ज्या गोष्टीची संपूर्ण महाराष्ट्र प्रतीक्षा करत होता, ती युती आज अखेर साकार झाली आहे,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचे संकेत दिले.
पक्षातली ‘मुलं’ पळवणाऱ्या टोळ्यांवर टीका
राज्यात सध्या सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत असं आपण ऐकतो, पण राजकारणात अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांनी राजकीय पक्षांमधली ‘मुलं’ (कार्यकर्ते/नेते) पळवण्याचा धंदा सुरू केला आहे. या टोळ्यांना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.”
जागावाटपाचा सस्पेन्स कायम
युतीमधील जागावाटपाच्या आकड्यांबाबत विचारले असता राज ठाकरे म्हणाले, “कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही जाहीरपणे सांगणार नाही. आमचे धोरण ठरले आहे. जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, त्यांना दोन्ही पक्षांकडून अधिकृत पाठिंबा असेल. अर्ज कधी भरायचे आणि पुढील तांत्रिक प्रक्रिया कशी असेल, याची माहिती उमेदवारांना दिली जाईल.”
वादापेक्षा महाराष्ट्र मोठा!
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मागील वादावर पडदा टाकत राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. “मी एका मुलाखतीत म्हणालो होतो की, आमची भांडणं एका बाजूला, पण त्यापेक्षा माझा महाराष्ट्र मोठा आहे. तिथूनच आमच्या एकत्र येण्याची ही प्रक्रिया सुरू झाली. आज आम्ही अधिकृतपणे ही युती जाहीर करत आहोत आणि मला बाकी जे काही बोलायचे आहे, ते मी आता थेट जाहीर सभांमधूनच बोलेन,” असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
कार्यकर्त्यांना आदेश
राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्रित काम करण्याचे आदेश दिले आहेत. “आता फक्त घोषणा झाली नाही, तर आता काम सुरू झाले आहे. जिथे मशाल असेल तिथे इंजिन धावेल आणि जिथे इंजिन असेल तिथे मशाल पेटेल,” अशा स्वरूपाचे चित्र आता राज्यभर पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…