मुंबई

Raj Thackeray Join Mahayuti : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा

• MNS Raj Thackeray Joins Mahayuti महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या गुढीपाडवा सभेत राज ठाकरे यांची घोषणा महायुती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्ती पाठिंबा

मुंबई :- गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाहीर सभा घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या या सभेला तुफान गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. त्यामुळे आज राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करताच केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि पर्यायाने सरकारला त्यांनी झापलं आहे. Raj Thackeray Join Mahayuti

निवडणूक आयोगावर निशाणा
महाराष्ट्रात पाच वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुका होतील असं म्हणता म्हणता अजूनही होत नाहीत. यामुळे २०१९ ला ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर आज निवडणुका होत आहेत. आता आचारसंहितावाले जागे झाले आहेत. परंतु, मी बातमी वाचली की निवडणुकीसाठी महानगपालिकेच्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला जुंपलं आहे. डॉक्टर मतदारांच्या नाडी मोजणार की नर्सेस डायपर बदलणार?” असा खोचक सवाल राज ठाकरेंनी विचारला.डॉक्टर आणि नर्सेसवर निवडणुकीची जबाबदारी टाकली असेल, तर त्यांनी तिथे जाऊ नये. जिथे रुग्णांसाठी तुम्ही आयुष्य घालवत आहात तिथे जा, तुम्हाला नोकरीवरून कोण काढतोय हेच बघतो”, असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. Raj Thackeray Join Mahayuti

मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचेही आदेश दिले आहेत. Raj Thackeray Join Mahayuti

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0