Raj Thackeray on Marathwada Flood: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान, राज ठाकरे यांनी प्रशासन कार्यकर्त्यांनी नेते मंडळी यांना केले आवाहन, सणासुदीच्या काळात बळीराजावर संकट
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करा Raj Thackeray on Marathwada Flood असं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना, प्रशासनाला, आणि मंत्री यांना केले आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाडा, नंदुरबार कोल्हापूर, परभणी, हिंगोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गणपतीचे आगमन होणार आहे.अशातच महाराष्ट्रातील बळीराजांवर मोठ्या प्रमाणात अस्मानी संकट आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.
तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल !
या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…