पुणे
Trending

Bharat Gogawale : गुप्त पूजा, राजकीय टोकाटोकी! भरत गोगावले यांच्या कथित अघोरी अनुष्ठानाचा व्हिडीओ चर्चेत

Bharat Gogawale Aghori Pooja Video: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादीचे भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी योजना (EGS) मंत्री भरत गोगावले यांचा एक कथित गुप्त पूजा Bharat Gogawale Aghori Pooja Video करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गोगावले यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

शिवसेनेचे वसंत मोरे आणि राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी आरोप केला की, भरत गोगावले यांनी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी आणि मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी गुप्त अनुष्ठानांचा आधार घेतला. शिवाय, रायगडचे पालक मंत्रीपद मिळवण्यासाठी अलीकडेच पुन्हा असे अनुष्ठान केल्याचाही दावा चव्हाण यांनी केला.

गोगावले यांची सफाई – “मी हिंदुत्ववादी, देवपूजेमुळे मंत्रिपद मिळत असेल तर वसंत मोरेला मी घेऊन गेलो असतो!”

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले, “मी एक हिंदुत्ववादी आहे. देव, धर्म, पूजा यावर माझा विश्वास आहे. आम्ही इंदौर येथील धार्मिक स्थळाला भेट दिली होती. तिथे हवन-पूजा झाली, त्यात काही गुप्त किंवा अघोरी नव्हते.”

गोगावले यांनी पुढे टोला लगावत सांगितले की, “वसंत मोरे यांना जर वाटत असेल की मी पूजा करून आमदार आणि मंत्री झालो, तर त्यांनी मला आधीच सांगायला हवं होतं. मी त्यांना बरोबर घेऊन गेलो असतो, म्हणजे त्यांच्या जामिनाही वाचली असती.”

दरम्यान, राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे. भरत गोगावले यांनी अशा बाबींवर विश्वास न ठेवता महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायला हवा.”

रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अघोषित स्पर्धा असल्यामुळे या प्रकाराने राजकीय कुरघोडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0