मुंबई
Trending

Raj Thackeray for Maharashtra Legislative Assembly : राज ठाकरेंनी आणखी दोन उमेदवारांचे नावे केले जाहीर

Avinash Jadhav and Raju Patil nominated by Raj Thackeray for Maharashtra Legislative Assembly : ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर राज ठाकरेंची घोषणा

डोंबिवली :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव Avinash Jadhav आणि कल्याण ग्रामीणचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील Raju Patil यांना उमेदवारी घोषित केले आहे. राज ठाकरे आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आता 24 ऑक्टोबरला दोघांचे उमेदवारी अर्ज भरताना मी उपस्थित राहणार आहे असे म्हणाले आहे. त्यावेळी त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचे नाव जाहीर केले आहे. Maharashtra Breaking News

राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर हात फिरवला जात आहे. आज किंवा उद्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होईल. यादी जाहीर होण्यापूर्वी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो, असे ठाकरे म्हणाले. 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी येणार आहे. अर्ज भरतेवेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे. Maharashtra Breaking News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0