मुंबईठाणे

Raj Thackeray : “बाप-लेकाच्या वयातही घोळ! ही कसली यादी?” 2024 च्या मतदार यादीतील त्रुटींवर राज ठाकरेंचा आयोगाला खरमरीत टोला

Raj Thackeray On EC : “याद्या सुधारल्याशिवाय निवडणूक घेऊ नका, कालचे नोटिफिकेशन रद्द करा” – राज ठाकरेंची थेट मागणी

मुंबई :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील कथित घोळावरून विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ आक्रमक झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही आयोगाच्या भूमिकेवर शिष्टमंडळाचे समाधान झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी आज आयोगाचा अत्यंत खरमरीत समाचार घेतला आणि मतदार यादीतील त्रुटींवर थेट बोट ठेवले.

कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाहीये!”

2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर राज ठाकरे यांनी अचूक बोट ठेवले. त्यांनी यादीतील काही नावे वाचून दाखवत आयोगाला टोला हाणला. ते म्हणाले, “चारकोप नंदिनी महेंद्र चव्हाण यांचे वय 124, तर महेंद्र श्रीनाथ चव्हाण यांचे वय 43! कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाहीये!” तसेच वडिलांचे आणि मुलांच्या वयातील हा प्रचंड फरक त्यांनी निदर्शनास आणून दिला. या गंभीर आरोपांवर आयोगाने तात्काळ दाखल्यासह उत्तर देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यादीत फक्त नाव, पत्ता नाही, फोटो नाही!’

2024 नंतर तयार केलेल्या यादीवरही राज ठाकरेंनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, “या यादीत फक्त नाव आहे, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही!” यादी सुधारण्यासाठी केंद्रीय आयोगाकडे विचारणा केल्यास राज्य आयोगाकडे आणि राज्य आयोगाकडे विचारणा केल्यास केंद्राकडे बोट दाखवले जाते.

राज ठाकरेंची मोठी मागणी

निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर असमाधानी असलेल्या राज ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे. “या याद्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“पालिकेच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांत झाल्या नाहीत. पाच वर्षे यात गेली, तरी याद्या सुधारण्यासाठी सहा महिने गेले तर काय फरक पडतो? याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नये,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. काल (14 ऑक्टोबर) काढलेले निवडणुकीसंबंधीचे नोटिफिकेशनही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोग उद्या काय भूमिका घेतो, हे पाहून एक-दोन दिवसांत विरोधी पक्ष पुढील दिशा ठरवतील. त्यामुळे आता आयोगाच्या पुढील निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0