Uncategorized

Raj Thackeray Delhi Visit News : मनसेच्या एनडीए प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार का? काल राज ठाकरे दिल्लीला रवाना

मुंबई :- राज ठाकरे महायुती मध्ये प्रवेश करू शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल (18 मार्च) रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपच्या बड्या नेत्यांना भेटू शकतात. दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाऊ शकते. राज ठाकरे दिल्लीत बैठक घेऊन किमान 2 जागांची मागणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत उपस्थित आहेत. Raj Thackeray Delhi Visit News

राज ठाकरे महायुतीत सामील होण्याची शक्यता काय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले होते की, राज ठाकरे हे सुद्धा आमची विचारधारा साजरे करणारी व्यक्ती आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. Raj Thackeray Delhi Visit News

राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरेही गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजता राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट होणार असल्याची माहिती आहे. परंतु ते भेट आज होणार असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर यांना तिकीट देण्याबाबत चर्चा होणार आहे. या जागेवर अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. मुंबईतील एका जागेच्या बदल्यात राज ठाकरे संपूर्ण राज्यात एनडीएचा प्रचार करणार आहेत. Raj Thackeray Delhi Visit News

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून स्पष्टीकरण
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीबाबत सर्व माहिती येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होईल. मात्र राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या, पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचाच असेल. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणे हे आमचे कर्तव्य असून यापुढेही त्यांच्या आदेशाचे पालन करू”. Raj Thackeray Delhi Visit News

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता एन्ट्री घेतली आहे. Raj Thackeray Delhi Visit News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0