Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या मराठावाडा दौऱ्यात बदल, 13 ऑगस्ट ऐवजी 11 ऑगस्टला दौरा संपणार
•राज ठाकरे आज नांदेडच्या दौऱ्यावर, मराठा आंदोलकांनी राज ठाकरे आणि समोर निदर्शने
मुंबई :- नवनिर्माण यात्रेच्या संकल्पनेतून राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा चालू केला आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे महाराष्ट्रात दौऱ्यावर आहे. राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत एकला चरोचा नारा दिला असून राज ठाकरेंनी आत्तापर्यंत तीन उमेदवार ही घोषित केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यंदाच्या निवडणुकीत एकला चलोचा नारा देत विधानसभा निवडणूक लढवणार आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दरम्यान राज ठाकरे आज नांदेड मधील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं. परंतु यादव यापूर्वी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आक्रोशाला समावे जावं लागले. सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे सोबत घोषणाबाजी केली यानंतर संतप्त राज ठाकरे यांनी चर्चा करण्यास विचारणे केल्या असता परंतु मराठा आंदोलन तिथून निघून गेले. राज ठाकरे यांचा सध्या मराठवाडा दौरा चालू असून आता तो दौरा तेरा ऐवजी 11 ऑगस्टला संपणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज ठाकरे 10 ऑगस्ट रोजी घेणार संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. 11 तारखेला सकाळी राज ठाकरे पुण्याला जाणार आहेत. प्रत्येक दिवशी ते दोन जिल्ह्यांना भेट देऊन बैठका घेणार आहेत.
शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यानंतर, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना मनसेनं मैदानात उतरवलं आहे.