मुंबई

Raj Thackeray BMC Election : “मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक असेल!”

Raj Thackeray On BMC Election : मुंबई महानगरपालिकेवरून राज ठाकरेंचं धक्कादायक वक्तव्य; “गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली समजा, हे लोक थैमान घालतील!”

मुंबई :- आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी मुंबईकरांना अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जर आपण गाफील राहिलो, तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल,” असे खळबळजनक विधान राज ठाकरे यांनी केले आहे.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षांवर (नाव न घेता) जोरदार हल्लाबोल केला.

रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका”
राज ठाकरे यांनी यावेळी मतदार याद्यांच्या घोळावर लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले, “एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही काही जमणार नाही. हातातून मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील.”

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना म्हटले की, “रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे गाफील राहू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्या ज्या काही सुरू आहेत त्यावरती लक्ष ठेवा. मतदार खरी आहे की खोटे आहे, याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे.”

हातातून मुंबई गेली तर…

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गंभीर इशारा देत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी माणसाच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले. “मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल,” असे ते म्हणाले. “जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा.”

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. महापालिका निवडणुकादेखील लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा केला जात आहे. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या गंभीर इशाऱ्यानंतर राज ठाकरे यांनी लवकरच आपली भाषणे आणि प्रचार सुरू होतील, असेही कार्यकर्त्यांना संकेत दिले.

vivek

Recent Posts