मुंबई

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, सरकारला पाठिंबा

Raj Thackeray Post For Devendra Fadnavis : पुढची 5 वर्षे सरकारच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमाला आमचा पक्ष पाठिंबा देईल, असे राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्या सर्व भावी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुभेच्छा.

मुंबई :- गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर एका शानदार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.

2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

राज ठाकरे पुढे म्हणाले की,पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0