•“राज ठाकरेंची जी इच्छा, तीच माझी दिशा” — नेतृत्वावर टाकला विश्वासाचा भार
मुंबई | राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, पण अलीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील ‘युती चर्चे’ला हवा मिळाली आहे. माध्यमांतून चर्चांचा धुरळा उडतोय, मात्र अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय —“युती ही वर्तमानपत्रात बोलून होत नाही, त्यासाठी थेट संवाद लागतो!”
संजय राऊत आणि इतर शिवसेना नेत्यांच्या रोजच्या चर्चांना उत्तर देताना, अमित ठाकरे म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत. त्यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. एक फोन करा, चर्चा करा. माध्यमांमधून युती होत नाही.”
फक्त बोलून होत नाही युती, फोन घ्या अन् चर्चा करा!” — अमित ठाकरे यांची थेट टोलेबाजी
ते पुढे म्हणाले, “मी काही ठरवू शकत नाही. राजसाहेब जे ठरवतील तीच आमची भूमिका असेल. मात्र, रोज उठून कुणी काहीतरी बोलत असेल, तर उत्तर द्यावंच लागतं.”
या साऱ्या पार्श्वभूमीवर मनसेकडून शिवसेनेला एक प्रकारचा घरचा आहेर देण्यात आला —“फक्त बोलणं सोपं असतं, कृती काहीच दिसत नाही. हे सगळं म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’!”
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “राज ठाकरेंनी एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आणि उद्धवजींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढची माहिती हे दोन्ही नेतेच देतील.”
राजकीय संकेत – चर्चा थांबली नाही, पण सुरुवात अजून झाली नाही!
शिवसेना आणि मनसे यांच्यातील भावनिक नातं आणि राजकीय शक्यता यांचं हे एक गूढ समीकरण बनलं आहे. जिथे प्रत्येक वाक्य, प्रत्येक मौन यामागे राजकारण लपलेलं आहे. ‘युती होणार की नाटकच चाललंय?’ याचं उत्तर सध्या तरी फक्त दोन भावांकडेच आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…