मुंबई

Rain Update : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय; मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज; रत्नागिरी, रायगडात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील दोन ते तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Mumbai Latest Rain Update

गेल्या आठवड्यात मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा जोर पकडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. मुंबई परिसरात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत — विशेषतः रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर — अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय, अकोला, अमरावती, बुलढाणा व नागपूर परिसरात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागांत, जसे की धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव इत्यादी ठिकाणी हलक्याफुलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘ला-निना’ प्रभावामुळे यंदा मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढगांची निर्मिती अधिक होईल, असेही सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 16 जूनपासून मोसमी वाऱ्यांनी पूर्ण व्याप घेतला आहे. सध्या ही प्रणाली गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असून, याचा परिणाम म्हणून आगामी आठवड्यात राज्यभरात विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago