मुंबई
Trending

रेल्वेचा मेगा ब्लॉक : उद्या रविवारी 13 एप्रिलला मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!

Mumbai Local Mega Block News : रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या विस्कळीत होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वेचे टाईम टेबल बघूनच घराबाहेर पडावे

मुंबई :- मुंबईकरांसाठी तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. Mumbai Local MegaBlock News रेल्वेने रविवारी 13 एप्रिल रोजी ब्लॉक घोषित केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार आहे.रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल रेल्वे या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावणार आहे. Mumbai Local Train Sunday Timetable

मध्य रेल्वे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार आणि डाउन जलद दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकवेळेत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत. अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. यामुळे लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार असून काही लोकल रद्द राहणार आहेत.

हार्बर रेल्वे
कुर्ला आणि वाशी अप आणि डाउन सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि पनवेल- वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

रेल्वे प्रशासन आणि नागरिकांना होणाऱ्या असुविधामुळे खेद व्यक्त करत प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0