•Mumbai Railway Mega Block मुंबईकरांसाठी रेल्वेने प्रवास करणार असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी, रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा
मुंबई :- मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी रविवारी रेल्वेने प्रवास करणार असाल मेगा ब्लॉकची वेळ बघून घराबाहेर पडा. उद्या रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक कालावधी 22 तासांचा असणार आहे. या ट्रॅफिक ब्लॉक काळात काही लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेकडून कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 चे विस्तारीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच यार्डातील रेल्वे मार्गिकांचा विस्तार करणे, नॉन इंटरलॉकिंगसह इतर यांत्रिकी कामे करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉकसोबतच चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ट्रॅफिक ब्लॉक काळात काही लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच काही ट्रेन अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावरही परिणा होणार आहे.
स्पेशल ब्लॉकचे वेळापत्रक रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.20 मिनिटांपासून ते सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर मध्यरात्री 1.20 वाजेपर्यंत असणार आहे. यासोबतच रविवारी सकाळी 10.40 ते दुपारी 1.40 वाजेपर्यंत डाऊन मार्गावर 3 तासांचा, अप मार्गावर दुपारी 12.40 ते दुपारी 1.40 वाजेपर्यंत एक तासाचा आणि अप-डाऊन मार्गावर सायंकाळी 7.20 ते मध्यरात्रीनंतर 1.20 वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे रविवारी मध्य रेल्वेच्या 8 लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द राहणार आहेत. तर 22 लोकल फेऱ्या अंशत: रद्द राहणार आहेत. याशिवाय 49 मेल-एक्सप्रेसवर परिणाम होणार आहे.
एक्स्प्रेस रद्द
दरम्यान ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे एक्सप्रेस (11011) आणि धुळे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (11012) रद्द करण्यात आल्या आहेत. तर 19 ऑक्टोबर 2024 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस (12140) नाशिक रोडपर्यंत, जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीबरथ एक्सप्रेस (12187) मनमाडपर्यंत अंशत: रद्द राहणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी नाशिक रोड येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (12139) संध्याकाळी 6.30 वाजता सुटेल.