Raigad Weather Update : रायगड मध्ये तुफान पाऊस, रायगड किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांचे सुटकी आजपासून रायगड पर्यटनासाठी बंद
Raigad Weather Update : रायगडावर ढगफुटी सदृश्य परिस्थिती, गडाच्या पायऱ्यांवर ओढ्याचे स्वरूप
रायगड :- शनिवार-रविवारी सुट्टी असल्याने अनेक पर्यटन गिर्यारोहक रायगडच्या गडकिल्ल्यावर पर्यटनासाठी जात असतात.गेल्या दोन दिवसांपासून कोकणात तुफान पाऊस सुरू आहे. तळकोकणात मुसळधार पावसाचा जोर आजही कायम असेल. सिंधुदुर्गासाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान रायगडावर पावसाची भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे. Raigad Weather Update
कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. किल्ले रायगडावर ढगफुटी व्हावी असा पाऊस कोसळल्यामुळे गडावर आलेल्या शिवभक्त आणि पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. गडाच्या पायऱ्यांना अक्षरशः ओढ्याचे रूप प्राप्त झाले होते. पावसाचा जोर इतका होता की, पायऱ्यांवर कंबरभर वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत होता. या प्रवाहामध्ये काही पर्यटक अडकून पडले होते. एकमेकांना आधार देत सर्वजण सुखरूप गडाखाली आले. काही पर्यटकांनी या भयंकर प्रवाहाचा आणि त्यात अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ काढून व्हायरल केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी धावपळ करून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर सर्व पर्यटकांना सुखरूप गडाखाली उतरवले. सुदैवाने या प्रवाहात कोणीही वाहून गेले नाही. Raigad Weather Update
रायगडमधील तुफान पावसामुळे अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे आज जिल्हा प्रशासनाने सर्वांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. तसेच रायगड किल्ला पर्यटनासाठी 8 जुलै बंद करण्याचे निर्देश प्रशासनासाठी दिली आहे. Raigad Weather Update