मुंबईठाणे
Trending

Nitesh Rane : ‘कॅश बॉम्ब’ वादात नीतेश राणेंचा पलटवार! – “ठाकरे सेनेने त्यांच्या कर्जतमधील फार्म हाऊसवर किती कॅश ठेवलीय, ते आधी सांगा.”

Nitesh Rane On Thackeray Family : “जगातलं सर्वात मोठं आश्चर्य!” – राणे यांची ठाकरे गटावर टीका; आदित्य ठाकरे म्हणाले, “हे व्हिडिओ अजूनही दिसतील”; तर वडेट्टीवार म्हणाले, “याच खोक्यांचा वापर निवडणुकीत झाला.”

नागपूर :- विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी ‘नोटांच्या बंडलांचे’ व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादावर भाजपनेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी आज (9 डिसेंबर) जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी ठाकरे गटाला थेट त्यांच्या कर्जतमधील फार्म हाऊसवरच्या ‘कॅश’वरून लक्ष्य केले.

नीतेश राणे यांचा थेट हल्ला

नीतेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका करताना गंभीर आरोप केले.”व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या ठाकरे सेनेवाले त्यांना सांगा, त्यांच्या मालकाच्या कर्जतमधील फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे. जरा जाऊन बघा, विचाराना,” असे राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कॅशच्या बाबतीमध्ये आरोप ठाकरे सेनेच्या आमदार किंवा कार्यकर्त्यांनी करतात हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे.”नीतेश राणे यांनी पत्रकारांना आवाहन केले की, “पत्रकार बांधवानी माझ्यासोबत कर्जतच्या फार्म हाऊसवर चला. जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचारा.”त्यांनी अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओची सत्यता तपासली जाईल असे सांगत, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कॅशच्या बाबतीमध्ये काही बोलूच नये, असे म्हटले. तसेच, “कर्जतच्या फार्महाऊसवर सर्च ऑपरेशन केले की मग कशी पळापळ होईल,” असेही राणे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचा प्रतिसवाल

या वादावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर टीका कायम ठेवली.आदित्य ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही आणि सत्ताधारी आमदार असे पैशाचा बॅग घेऊन फिरतात. यापूर्वीही असे व्हिडिओ समोर आले होते, अजूनही दिसतील. आता सर्व ठिकाणी हेच सुरू आहे.”

“ते जे हेलिकॉप्टरमध्ये ज्या बँगा घेऊन फिरत आहात आणि हे जे आनंदाच्या शिधाचे वाटप सुरू आहे, ते कुणाचे आहे?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया

विजय वडेट्टीवार (काँग्रेस): “निवडणुकीत जो पैशाचा वापर झाला हा याच खोक्याचा वापर झाला आहे, हे कुठेही लपून राहिलेले नाही. इतका पैसा कमावला गेला आणि सरकारची तिजोरी खाली केली गेली आहे, तिजोरी ओरबडून खाल्ली आहे. राज्यात असा धिंगाना कधीच पाहिला नाही. दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चूक काहीही नाही.”

नाना पटोले (काँग्रेस): “सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि त्यातून पुन्हा सत्ता हा या महायुतीचा खेळ आहे. त्यामुळे हा खेळ आपल्याला वारंवार पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने राज्य लुटण्यासाठी यांना सत्ता पाहिजे म्हणून ते स्थानिक स्वराज्य संस्थादेखील सुटत नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0