मुंबई
Varsha Gaikwad : काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती

•Varsha Gaikwad काँग्रेसची बैठक रद्द, आमदार वर्षा गायकवाड गैरहजर
मुंबई – महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या कथित वादामुळे आज मुंबई काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांच्या अनुपस्थितीचे कारण देण्यात आले आहे.
मविआच्या जागावाटपात मुंबईतील 6 पैकी केवळ 2 काँग्रेसच्या वाट्याला आल्यात. त्यात दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. या प्रकरणी बुधवारी दुपारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण वर्षा गायकवाड यांच्या गैरहजेरीमुळे ती ऐनवेळी रद्द करण्यात आली. आता ही बैठक उद्या गुरुवारी होणार असल्याची माहिती आहे.