Bihar Election Update : बिहारमध्ये NDA चा ऐतिहासिक विजय! 200 हून अधिक जागांवर आघाडी; भाजप, जदयू, लोजपाची निर्णायक कामगिरी

Bihar Election Latest News : नितीश कुमारांनी मानले मोदींसह सर्व पक्षांचे आभार; ‘घुसखोरांच्या समर्थकां’विरुद्धच्या धोरणाचा विजय: अमित शहा
ANI :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Election 2025) सत्ताधारी एनडीए (NDA) आघाडीने विरोधी महागठबंधनचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात एनडीएने 200 हून अधिक जागांवर निर्णायक आघाडी घेतली असून, तर महागठबंधन अंदाजे 35 जागांवर पिछाडीवर आहे. Bihar Election Latest News
निकालांचे कल स्पष्ट होताच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएतील सर्व सहकारी पक्षांचे आणि बिहारच्या जनतेचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमार आणि एनडीएच्या इतर नेत्यांचे अभिनंदन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे निकाल म्हणजे, “भारताच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध मोदी सरकारच्या धोरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे.”
सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 127 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात भाजपला 61, जदयूला 41 तर लोजपाला 8 जागांवर विजय मिळाला आहे. कल आणि विजय दोन्ही मिळून भाजप 90, जदयू 84 आणि लोजपा 19 जागांवर पुढे आहेत. तर राजद 25 आणि काँग्रेस 6 जागांवर मागे आहेत. नितीशकुमार यांच्या जदयू आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीमध्ये ही मुख्य लढत होती. या निवडणुकीत राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. एनडीएच्या या मोठ्या विजयानंतर बिहारमध्ये आता सरकार स्थापनेच्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.



