रायगड : खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौक दुरक्षेत्र परिसरात मुख्य बाजारपेठमधे अवघ्या दोन मिनीटांच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेत महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गल्लीत तसेच तुपगाव जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला राईस मिल रोड लगत राजरोसपणे दिवस रात्र चौक पोलीसांच्या आशिर्वादाने मटका सुरू असून पोलीसांनी या अवैध धंद्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केलेले असून हा बेकायदेशीर मटका जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक व महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे हा बेकायदेशीर मटक्याच्या अड्डा सर्वात मोठा असून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे त्यामुळे मटकाचालकाची चंगळ होत आहे . मटका खेळणारे आकडे लावण्यासाठी गल्ली बोळातून बाहेर आपल्याच नादात तंद्रीत येतात त्यामुळे एकमेकांची टक्कर होते.त्यामुळे वाद विवाद निर्माण त्याचे रूपांतर परिणामी भांडणे होत आहे.पोलीसांना पोलीस दलाकडून मिळणाऱ्या कमी पगारातून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नसल्याने येथील पोलीसांनी आर्थिक मदतीकरिता मटका जुगाराचा आधार घेतलेला आहे. परिणामी गृहमंत्री व पोलीस अधीक्षक यांनी येथील पोलीसांच्या या समस्येची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. एक तर येथील मटका जुगार कायमचा बंद करावा किंवा येथील पोलीसांचा पगार दुप्पट वाढविण्यात यावा! जर असे केले तरच येथील पोलीसांची आर्थिक समस्या दूर होईल, असे काही सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे!
दरम्यान, चौक बाजारपेठेत हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असून देखील पोलिस कानाडोळा करत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध मटक्याच्या अड्ड्यांवर आकडे लावण्यासाठी हातमजुरी करणारे महिला, पुरुष, रिक्षावाले, तरूण पिढी दिवसभरात कमविलेले पैसे लावुन मटक्याचे आकडे लावण्यासाठी गर्दी करीत असतात.त्यामुळे अवैध मटक्याच्या नांदी लागलेल्या कंगाल होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील महिला वर्गामध्ये पोलीसांविरूद्ध संतापाची लाट पसरलेली असून बेकायदा मटका -जुगाराला साथ देणाऱ्या येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तसेच चौक दुरक्षेत्र पोलिस चौकीचे पोलिस यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी येथील नागरीक व महिला वर्गाकडून केली जात आहे. या मटक्याच्या अड्ड्यांवर दिवसभर चिठ्ठ्यावर आकडे देणारे चालकांनी काही महिलांना धंद्यावर कामाला ठेवले आहे त्यामुळे तेथे भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या महिला दिवसभराची कमाई मटक्याच्या अड्ड्यावर आकडे लावताना दिसत आहे या अवैध मटक्याच्या अड्ड्यांवर चिमणी पाखरं,सोरट, कल्याण बाजार मटका तेजीत सुरू असुन शेकडोंच्या संख्येने खोपोली , खालापूर , कर्जत रसायनी लोहोप,चौक,लोधिवली परिसरातील शौकीन मटका खेळण्यासाठी येत असतात.जणू या अड्ड्यांवर जत्रेचे स्वरूप पहावयास मिळत आहे. आहे.त्यातच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीसांनी या बेकायदेशीर अवैध धंद्यावर ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केलेले असल्याची चर्चा सुरू आहे.तरी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी लक्ष घालून हे अवैध मटक्याच्या अड्ड्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…