Raigad Bribe News : भूकरमापक कर्मचाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक

•विशाल हे भूमी अभिलेख कार्यालय म्हसळा येथे भूकरमापक अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या जमीन मोजणीचा अर्ज केला आहे. त्यावेळी लोकसेवक विशाल यांनी जमिमीची मोजणीकरून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
रायगड :- रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील भूकरमापक कर्मचाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.17 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.विशाल भिमा रसाळ असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल हे भूमी अभिलेख कार्यालय म्हसळा येथे भूकरमापक अधिकारी आहेत. यातील तक्रारदार यांनी त्यांच्या जमीन मोजणीचा अर्ज केला आहे. त्यावेळी लोकसेवक विशाल यांनी जमिमीची मोजणीकरून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.माणगाव एसटी बस स्टॉप समोर त्याला लाच मागीतली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा कारवाई करत 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे,संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे, सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो रायगड, सहाय्यक फौजदार विनोद जाधव,अरूण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील,सागर पाटील यांनी कारवाई केली आहे.


