Raigad Bribe News : 10 हजारांची लाच स्वीकारताना उप अभियंता, बांधकाम विभाग यांना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
•समाजकल्याण सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजुरीसाठी मागितली होती टक्केवारी
रायगड :- अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत धडक कारवाई केली आहे. श्रीवर्धन येथील जिल्हा परिषद उपविभागातील उप अभियंता यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.तसेच ताब्यात घेतले. उपअभियंता डॉ. प्रवीण पंढरीनाथ मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे श्रीवर्धन या ठिकाणी सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचे बिल मंजुरीसाठी टक्केवारी म्हणून 13 हजार रुपयांची लाच मागितली होती. यातील पहिला हप्ता म्हणजेच दहा हजार रुपये स्वीकारताना उप अभियंता मोरे यांना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,रायगड जिल्ह्यात भावे, भावे बौद्ध वाडी येथील केलेल्या सभागृहाचे देयक काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा रायगड जिल्हा परिषदेचा, श्रीवर्धन येथील उपअभियंता डॉ.प्रवीण पंढरीनाथ मोरे, वर्ग-1 बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद उपविभाग श्रीवर्धन, यास रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्रीवर्धन येथून ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांना भावे बौद्ध वाडी, तालुका श्रीवर्धन या ठिकाणी सभागृहाचे बांधकामाचे 7 लाख रुपयाचे कंत्राट 2023-24 या कालावधीत मिळाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार याना समाजकल्याण अलिबाग खात्याकडून 1.40 लाख रुपयांचे बिल प्राप्त झालेले आहे. मंजूर झालेल्या बिलाची टक्केवारी म्हणून 2 हजार 500 रुपये व उर्वरित राहिलेले रुपये 5 लाख 60 हजार हे बिल कार्यकारी अभियंता. रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे पाठविण्याच्या मोबदल्यात व मंजूर करण्यास मदत करण्यासाठी दहा हजार पाचशे रूपये अशी एकूण रक्कम रुपये 13 हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार 22 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाली होती.
एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने दि.23 जानेवारी 2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी उप अभियंता मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 13 हजार रुपयांची लाचेची रक्कम मागणी करून पहिला हप्ता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. एसीबीने सापळा रचून दरम्यान आरोपी मोरे यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये 10 हजार रुपये पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून स्वीकारली असता त्यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी मोरे यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाडावे पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबाग,सापळा व तपासी अधिकारी निशांत धनवडे , पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अलिबाग रायगड, सापळा पथक निशांत धनवडे , पोलीस निरीक्षक संतोष भिसे ,पोलिस निरीक्षक सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार सचिन आटपाडकर
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबाग यांनी कारवाई करत लाचखोर सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे.