महाराष्ट्र
Trending

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध!

Maharashtra Legislative Assembly Speaker Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध आणि एकमताने निवड

मुंबई :- राज्यात महायुतीला एक हाती सत्ता स्थापन करण्यात यश आली असून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि अजित पवार Ajit Pawar यांनी शपथ घेतली होती. हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली होती.मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी 7 डिसेंबर आणि रविवारी 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर Rahul Narvekar यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

राहुल नार्वेकर कोण आहे?
राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

यानंतर आता झालेल्या 2024 च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले. राहुल नार्वेकर हे 2022 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0