देश-विदेश

Rahul Gandhi : मतदारसंख्या की मते फुगवण्याचा खेळ? राहुल गांधींचा फडणवीसांच्या मतदारसंघावर गंभीर आरोप!

Rahul Gandhi On CM Devendra Fadnavis : नागपूरमध्ये एका दिवसात 20-50% मतदार वाढले – राहुल गांधींचा संशय स्पष्ट

ANI :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या प्रक्रियेवर आता पुन्हा एकदा सावल्यांचा पडदा झाकला जात आहे. Rahul Gandhi On CM Devendra Fadnavis काँग्रेसचे माजी अध्यक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या दक्षिण-मध्य मतदारसंघात संशयास्पद वाढलेल्या मतदारसंख्येवरून थेट निवडणूक आयोगालाच प्रश्न विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत न्यूजलॉन्ड्री या पत्रकारिताविषयक संकेतस्थळाच्या विश्लेषणाचा दाखला दिला आहे. त्यानुसार, फडणवीसांच्या मतदारसंघात निवडणुकीआधी अवघ्या पाच महिन्यांत तब्बल 8 टक्क्यांनी मतदारसंख्या वाढली, तर काही बूथवर ही वाढ 20 ते 50 टक्क्यांपर्यंत गेली. राहुल गांधी म्हणाले, “ही मतांची चोरी आहे आणि निवडणूक आयोग हे झाकण्याचा प्रयत्न करत आहे.”

तक्रारी केवळ संख्येपुरत्या मर्यादित नाहीत. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, अनेक बूथ लेव्हल ऑफिसर्सनी (BLOs) अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार केली आहे. पडताळणी न झालेल्या हजारो मतदारांच्या नावांची नोंद प्रसारमाध्यमांनीच उघड केली, मात्र निवडणूक आयोग मौन बाळगत आहे, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काही ठोस मागण्या केल्या आहेत. राहुल गांधी म्हणतात, “मतांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही मशीन-रीडेबल मतदार याद्या व सीसीटीव्ही फूटेज सार्वजनिक करण्याची मागणी करतो.”

बिहार यूथ काँग्रेसनेही या आरोपांना पुष्टी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, केवळ सहा महिन्यांत 29,219 नवे मतदार नोंदवले गेले, म्हणजेच दररोज सरासरी 162 नव्या नोंदी! एकूण मतदारसंख्येत ही 8.25 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट होते.

vivek

Recent Posts