मुंबई
Trending

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी नाशिक मधील सभेतून केंद्र सरकारवर हल्लाबोल

नाशिक :- राहुल गांधी Rahul Gandhi यांची भारत जोडो न्याय यात्रा Bharat Jodo Nyay Yatra अंतिम टप्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज राहुल नाशिकमध्ये रोड शो करणार आहेत. शेतकरी मेळाव्यात बोलताना रामराम मंडळी म्हणत राहुल गांधींची मराठीतून भाषणाला सुरूवात, देशात महागाई, बेरोजगारी, आणि भागिदारी वाढली आहे, असे म्हणत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी महागाई यावर मोदी सरकार का बोलत नाही, कांद्यांच्या भावावर मोदी सरकारकडून काहीच का बोलले जात नाही, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, अरबपती लोकांचे कर्ज माफ करण्यात आले, पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली नाही, आमच्या सरकार असताना 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. आम्ही एक वेळा तुमचे कर्ज माफ केले त्यांच्या 24 पटीने 20 ते 25 लोकांचे कर्ज माफ केले, ते 20 ते 25 लोक आहेत त्यांच्याकडे देशातील 70 करोड लोकांइतके पैसे त्यांच्याकडे आहे.दरम्यान राहुल गांधी नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात बोलत असताना त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 10 वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने काय केले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवारांचे भाजपवर टीकास्त्र

नाशिक हा महात्मा गांधी आणि नेहरुंचे स्वागत करणारा जिल्हा आहे. कांदा, द्राक्षाचे उत्पादन करताना घाम गाळतो पण सत्ता ज्यांच्या हाती त्यांना शेती आणि शेतकऱ्यांची चिंता नाही. दिल्लीत कांदा प्रश्नावर चर्चा होणार म्हणून मी थेट चांदवडमधून दिल्लीत गेलो होतो, तेव्हा किंमतीवर त्यांनी चिंता व्यक्त केली होती, असे शरद पवार म्हणाले.

केंद्रात काम करत असताना विरोधकांनी कांद्याच्या माळा घातल्या. तेव्हा मी सांगितलं की तुम्ही कोणत्याही माळा घाला. पण शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. मी शेतकरी पत्नीला भेटलो. पतीने आत्महत्या केली होती. कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून बँकेने नोटीस पाठवली होती. तेव्हा मी मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करुन आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याचा विचार केला. आजच्या स्थितीत प्रत्येक शेतकरी संकटात आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे.

खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला

संजय राऊत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हणाले की, राहुल गांधी हजारो किलोमीटर पायी चालत आहेत. लोकांची भेटत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत. सद्यस्थितीत काही नेत्यांनी दुसऱ्यांचे ऐकायचेच नाही केवळ स्वतःचेच सांगायचे असे धोरण स्विकारले आहे. याऊलट राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकत आहेत. स्वतःची मन की बात फार कमी सांगत आहेत. राहुल गांधी आता 2 दिवसांत मुंबईला पोहोचतील तिथे त्यांचे भव्य स्वागत केले. त्यात बोलताना संजय राऊत यांनी केंद्रावर तिखट हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्या सभेसाठी भाड्याने आणले जातात. पण राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोक स्वतःहून येतात. स्वतःहून चालतात. स्वतःहून आपले विचार मांडतात. हेच आपल्या देशातील संभाव्य परिवर्तनाची नांदी आहे, असे ते म्हणाले. देशात गद्दार आमदार व खासदारांना प्रत्येकी 50 कोटींचा भाव मिळतो. पण शेतकऱ्यांच्या कांद्याला मात्र कोणताही भाव मिळत नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
भारत जोडो न्याय यात्रा घेऊन आता महाराष्ट्रात पोहोचलेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर काश्मीरमध्ये चाललो आहे. हा नेता देश जोडण्यासाठी, माणसांची मने जोडण्यासाठी देशभर पायी चालत आहे. त्यांच्याकडे पाहून मला माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण येते. इंदिरा गांधी यांच्याविषयी इंदिरा गांधी आई है नई रोशनी लाई है अशी घोषणा दिली जात होती. तीच नवी रोशनी व नवा प्रकाश घेऊन राहुल गांधी या देशात आणि या महाराष्ट्रात आलेत. आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0