Uncategorized

Rahul Gandhi In Nandurbar : राहुल गांधी यांनी आदिवासींच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल

नंदुरबार :- काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाली. त्यानंतर त्यांनी आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातील टेंभली येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांचे स्थानिक आदिवासींनी स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे मोदी सरकारने या देशातील उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले, पण आदिवासींना एक रुपयांचाही दिलासा दिला नाही, हे सरकार केवळ उद्योगपतींचा विचार करते, असा घणाघात गांधी यांनी मोदी सरकारवर केला. Rahul Gandhi In Nandurbar

राहुल गांधी म्हणाले की, बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते पण आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो. देशाची पहिली ओळख असलेल्या आधारकार्ड सर्वात आधी आम्ही या नंदुरबारमध्येच का लागू केला. कारण आम्हाला संदेश द्यायचा होता की, आदिवासी हेच मुळ मालक आहेत. येथील जमीन, पाणी, जंगलावर तुमचा हक्क आहे. बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते आणि जंगल संपवण्याचे काम करते. जंगल, जमीन हे सर्व अदानी सारख्या करोडपतींना दिली जाईल आणि मग बीजेपी तुम्हाला म्हणेल की, तुम्ही वनवासी आहात, जंगल तर राहिलेच नाही. तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. Rahul Gandhi In Nandurbar

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही देशाचा एक्स-रे करायचा आहे, एमआरआय करायचा आहे. यातून कोणाला किती त्रास झाला, कोणाला किती जखमा झाल्या याचा शोध घ्यायचा आहे. आदिवासींसाठी आम्ही पाच महत्त्वाच्या बाबी आमच्या बजेटमध्ये टाकल्या आहेत. गांधी पुढे म्हणाले की, काँग्रेसने वनजमिनींच्या अधिकाराचा कायदा आणला होता. मात्र, भाजपने हा कायदा कमकुवत केला. आदिवासींचा जमिनीवरील दावा फेटाळण्यात आला. भाजपने आदिवासी समाजाला त्यांच्या जमिनींचा ताबा दिला नाही. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही एका वर्षात आदिवासींना त्यांच्या जमिनी परत करु, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. जिथे आदिवासी समाजाची लोकसंख्या 50 टक्के आहे तिथे आम्ही संविधानातील शेड्यूल 6 ची अंमलबजावणी करु. जेणेकरुन आदिवासींना स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. Rahul Gandhi In Nandurbar

महाराष्ट्र भाजपांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर

महाराष्ट्रात येऊन आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवळा दाखवणारे घराणेशाहीचे ‘फेल प्रॉडक्ट’ राहुल गांधी जातीवाद गरळ ओकत आहेत.

याच राहुल गांधीने आणि याच्या काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजातून येणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पावलोपावली अपमान आणि विरोध केला.

काँग्रेसने नेहमी बिरसा मुंडा यांच्या सारख्या अनेक आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच कुटुंब आणि त्यांचे युवराज एवढेच मर्यादित असलेले हे ‘फेल प्रोडक्ट’ आज आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

त.टी. – भारताचा एक्स-रे काढण्याच्या बाता मारण्याआधी तुमच्या गुडघ्याचा एक्स-रे तेवढा काढून घ्या.

“नफरतों को बेचकर
भारत को तोडना नियत है तुम्हारी
पर भारत ही है परिवार हमारा
हर एक को क़ाबिल बनाना जिम्मेदारी है हमारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0