Rahul Gandhi : राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर, धारावीतील छोट्या उद्योग व्यापाऱ्यांची संवाद

Rahul Gandhi Visit Mumbai : राहुल गांधी मुंबईत मुक्काम करणार
मुंबई :- लोकसभेचे विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले Rahul Gandhi Mumbai Visit असून ते आज रात्री मुंबईत मुक्काम करणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेतली असून ते धारावीतील लहान उद्योग व्यापाऱ्यांची चर्चा करणार आहे तसेच संवादही साधणार आहे. rahul Gandhi Visit Dharavi राहुल गांधी पुन्हा एकदा भारतातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची संवाद साधत आहे. मुंबईनंतर राहुल गांधी हे अहमदाबादला जाणार आहे.



राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत.राहुल गांधी यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरे गटासह धारावीवासियांचाही विरोध आहे. राहुल गांधी यांनी आज धारावीत भेट देत तिथल्या मजुरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.
•राहुल गांधींचा मुंबई दौरा खालीलप्रमाणे
- 6 मार्च रोजी सकाळी 9:00 – 11:10 वाजेदरम्यान एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून मुंबईत येणार.
- आज ते धारावीतील छोट्या उद्योगांशी संवाद साधणार.
- त्यानंतर बाकीचा दिवस राखीव आणि ट्रायडंट, बीकेसी येथे रात्रीचा मुक्काम करणार.
- 7 मार्च रोजी सकाळी 8:55 वाजता राहुल गांधी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने अहमदाबादला पोहोचतील. तिथे ते गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटी (GPCC) च्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील.