मुंबई

Rahul Gandhi: 20 ऑगसला देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर

Rahul Gandhi Maharashtra Tour : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांची राज्यातील नेत्यांशी मॅरेथॉन बैठका

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असताना आता काँग्रेसनेही बैठकीचा सत्र चालू केले आहे. देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi येत्या 20 ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ते राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेणार आहे. तसेच लोकसभेच्या यशानंतर विधानसभा करिता काँग्रेसकडून कशाप्रकारे राजनीती आखली जाते हे पाहावे लागेल. Maharashtra Politics Latest News

काँग्रेस विधानसभेच्या निवडणुका ही महाविकास आघाडी या तीन पक्षासोबत लढणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस विधानसभेवर अधिक जागेवर दावा केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या चर्चा करिता महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत जागा वाटपाच्या संदर्भात काल बैठक घेतली होती. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत,आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते तर काँग्रेसकडून राहुल गांधी, मलिकार्जुन खरगे प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेसने महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करावा अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मागणी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेचे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असल्याचे सांगितले होते त्यामुळे महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्यापही स्पष्ट नसतानाही राजकीय दावे सर्वान पक्षांकडून चालू आहे. Maharashtra Politics Latest News

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले अद्याप दिसून आलेले नाही. खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानाला काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील विरोध केला होता. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची पसंती नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Maharashtra Politics Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0