Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण, राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम
मुंबई :- काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर Rahul Gandhi Kolhapur Visit येणार आहेत. कोल्हापुरातील कसबा- बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. 4 तारखेला राहुल गांधी यांचा कोल्हापुरातच मुक्कामी असणार आहेत. तर राहुल गांधी 5 तारखेला विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहे. राहुल गांधी दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाविकास आघाडीचे अनेक नेते राहुल गांधी यांची भेट घेऊ शकतात तसेच जागा वाटप संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Latest News
राहुल गांधी यांचा दौरा कसा राहणार?
राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर विमानतळावर येत आहेत. विमानतळावरु कसबा बावड्यामधील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
दुसऱ्या म्हणजेच (5 ऑक्टोबर) दिवशी दुपारी 1.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. यानंतर हॉटेल सयाजीमध्ये होणाऱ्या संविधान संवाद सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील.
दरम्यान, हॉटेल सयाजीमध्ये होत असलेल्या संविधान संमेलनासाठी विविधसामाजिक संघटनेची निमंत्रित बाराशे प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. 14 वर्षांनी राहुल गांधी कोल्हापुरात येत असल्याने आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसव नियोजन करत आहे. Maharashtra Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…