Rahul Gandhi : भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करतात ; काँग्रेस नेते राहुल गांधी
Rahul Gandhi on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी लाल संविधानाच्या पुस्तकावरून राहुल गांधी यांच्यावर निशाणा राहुल गांधीकडून जोरदार फडणवीस यांच्यावर पलटवार
मुंबई :- देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis माध्यमांशी बोलताना म्हणाले की राहुल गांधी Rahul Gandhi एक पुस्तक आपल्याला दाखवतात ते खरं म्हणजे संविधानाचा सन्मान केला पाहिजे पण लाल सविधान का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता. तसेच, राहुल गांधी हे शहरी नक्षलवादी च्या जाळ्यात अडकले असल्याचेही म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय आरोपाची मालिका चालू झाली आहे. Rahul Gandhi on Devendra Fadnavis काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल संविधानावरून केलेल्या टीकेला जोरकसपणे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मते, बाबासाहेबांचे संविधान दाखवून दाखवून जातनिहाय जनगणनेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी संकल्पना आहे. भाजपची ही विचासरणी म्हणजे संविधानाचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा अवमान आहे, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशात अराजकता पसरवण्याचे काम होत असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो या समुहातील अनेक संघटना अतिशय टोकाच्या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येय धोरणे पाहिली, त्यांची कामाची पद्धत पाहिली तर त्या अराजकता पसरवत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. खरे म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधान का? तुम्ही लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि अराजकतावादाचा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान व भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम याठिकाणी होत आहे. अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही.
अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मने प्रदूषित व कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचे रोपण करायचे. जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या व्यवस्था आहे, त्याच्यावरून त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हीच अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधी यांच्यामुळे देशात होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.