‘आर ए स्टुडिओ’ ओलीस प्रकरण: रोहित आर्याला मी स्वतः चेकने पैसे दिले होते – दीपक केसरकर यांचा खुलासा

Dipak Kesarkar On Rohit Arya : ‘शासनाचे 2 कोटी येणे योग्य नाही’; रोहित आर्या मनोरुग्ण नसल्याचेही माजी मंत्र्यांचे मत
मुंबई :- मुंबईतील पवई Mumbai Powai येथील स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि नंतर एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या रोहित आर्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. रोहित आर्या Rohit Arya याने मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी शासनाकडून 2 कोटी रुपये मिळाले नसल्याचा आरोप केला होता. या आरोपासाठी त्याने माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर Dipak Kesarkar यांच्या काळात उपोषणही केले होते. Mumbai Latest Breaking News
रोहित आर्याच्या कृत्यानंतर दीपक केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर बोलताना मोठा खुलासा केला आहे.
दीपक केसरकर यांचा खुलासा
वैयक्तिक मदत: “मी शिक्षणमंत्री होतो, तेव्हा पर्सनली त्यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वतः पैसे दिलेले आहेत,” असा खुलासा दीपक केसरकर यांनी केला.
शासनाच्या पैशावर शंका
“शासनाच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की, 2 कोटी रुपये मला येणं आहे, हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत,” असे केसरकर म्हणाले.
योजनेवर स्पष्टीकरण: रोहित आर्या हे ‘स्वच्छा मॉनिटर’ नावाची एक स्कीम चालवत होते आणि शासनाच्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी काही मुलांकडून फी वसूल केली, असे विभागाचे म्हणणे होते. पण रोहित आर्या यांनी हे आरोप फेटाळले होते.
कृत्य चुकीचे: “याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे,” अशी भूमिका केसरकर यांनी मांडली.
‘रोहित आर्या मनोरुग्ण नाही’
रोहित आर्याला मनोरुग्ण म्हणणे योग्य नाही, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले. “त्यांनी याआधी उपोषण केले होते, त्यामुळे ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते असं दिसत नाही. शासनाकडे काम करताना नियम पाळावे लागतात. शासनाचे पैसे बुडत नाहीत. त्यांनी आपली बाजू सिद्ध करावी आणि पैसे घ्यावे,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले. नियमाप्रमाणे काही पैसे मिळाले असतील आणि मी वैयक्तिक सहानुभूती म्हणून स्वतः पैसे दिले होते, असे त्यांनी सांगितले.


