पुणे : घरातील 84 तोळे दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक, जीवे ठार मारण्याची दिली होती धमकी

Pune Yerwada Police Latest News : येरवडा पोलिसांची कामगिरी ; पंधरा वर्षाच्या मुलाला लक्ष करून चोरट्यांनी घरात घातला दरोडा, जीवे ठार मारण्याची दिली होती धमकी
पुणे :- पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका कुटुंबाला तीन सराईत गुन्हेगारांनी लक्ष करून तब्बल 84 तोळे सोन्याचे दागिने चोरी Pune Gold Robbery Case केल्याची घटना येरवडा पोलीस ठाण्यात Pune Yerwada Police News दाखल करण्यात आली होती. पंधरा वर्षीय मुलाला लक्ष करून कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तब्बल 25 लाख रुपयांचे 84 तोळे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा बुद्धिमान चोरट्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये चोरी केली होती. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सराईत गुन्हेगारांनी येरवडा परिसरातील विठ्ठल निवास प्रतीक नगर येथे राहणाऱ्या व्यापारी सागर विनोद गोयल याच्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यादरम्यान आरोपींनी संघटितपणे अपराध करून फिर्यादी सागर यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाला लक्ष्य करून त्याला व तुमच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या घरातून तब्बल 84 तोळे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केल्याची तक्रार सागर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. घटना नोव्हेंबर च्या दरम्यान घडली होती त्यादरम्यान सागर यांना तिन्ही सराईत गुन्हेगारांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित नवनाथ ओव्हाळ (29 वय रा. जाधव नगर, येरवडा), रेहान शब्बीर कुरेशी (25 वय रा. मेंटल कॉर्नर येरवडा), स्टीफन जॉन शिरसाट (19 वय रा. सोमनाथ नगर, वडगांवशेरी) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2),308(6),111,3(5) सह बाल न्याय संरक्षण अधिनियमन कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महेश लामखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि विशाल टकले सहाय्यक पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे करत आहे.



