पुणे
Trending

Pune Suicide News : खडकवासला एनडीएत विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेतल्याने खळबळ

Pune Suicide Latest News : उत्तर प्रदेशातील 18 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पुणे :- पुणे शहरातील खडकवासला भागात असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि एनडीएच्या कॅम्पसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.अंतरिक्ष कुमार (वय 18, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. Pune Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिक्ष कुमार हा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी असून, त्याचे वडील माजी सैनिक आहेत. अंतरिक्षने याच वर्षी जुलै महिन्यात पहिल्या सत्राकरिता एनडीएत प्रवेश घेतला होता. Pune Breaking News

पहाटेच्या सुमारास घटना

आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास अंतरिक्ष कुमारने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

एनडीएसारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे उत्तमनगर पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या घटनेमागील नेमक्या कारणांचा आणि विद्यार्थ्याच्या मानसिक स्थितीचा तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0