Pune Spa Racket | बुधवार पेठ नव्हे, आंबट शौकिनांचा मोर्चा आता ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या ‘स्पा’कडे
- सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने ‘पिटा’ कारवाया थंडावल्या
पुणे, दि. 9 सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Spa Racket
काळाच्या ओघात सर्व काही बदलत हे खरचं आहे. मग आंबट शौकिनांची पसंत मागे कशी राहणार. आंबट शौकिनांनी आता आपला मोर्चा बुधवार पेठेतून थेट ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या ‘स्पा’कडे वळविल्याची चर्चा आहे. स्पा च्या नावाखाली चालणारे रॅकेट नावारूपाला आले आहेत. त्यातच पुणे पोलिसांनी सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आणल्याने स्पा रॅकेट चालविणाऱ्याना सुगीचे दिवस आले आहेत. Pune Spa Racket
पुण्यातील बहुतांशी आंबट शौकिनांकडे मुबलक पैसा असल्याने त्यांनी बुधवार पेठ ओलांडून हायप्रोफाईल ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या ‘स्पा’कडे मोर्चा वळविला आहे. पुण्यातील हायप्रोफाईल परिसर यासाठी कुप्रसिद्धीस आला आहे.
‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या स्पा मुळे स्पा व्यवसाय होतंय बदनाम
आयुर्वेदिक स्पा, बॉडी स्पा, थाई स्पा यांसारखे अस्सल बॉडी ट्रीटमेंट देणारे स्पा या ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या स्पा मुळे नाहक बदनाम होत आहेत. ‘स्पा’ च्या नावाखाली रॅकेट चालत असताना ‘स्पा’ व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे.
सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने ‘पिटा’ कारवाया थंडावल्या
अवैध मानवी वाहतूक व वेश्या व्यवसाय यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस, गुन्हे शाखेत सामाजिक सुरक्षा पथक कार्यान्वित होते. आता सामाजिक सुरक्षा पथक संपुष्टात आल्याने ‘पिटा’ कारवाया थंडावल्याची चर्चा आहे.