Pune Sex Racket : मसाजच्या नावाखाली ‘देहविक्री’चा धंदा; पुणे पोलिसांचा पर्दाफाश, 6 महिलांची सुटका

Pune Police Busted Sex Racket : गुलटेकडी परिसरातील ‘वसुंधरा सेंटर’वर पोलिसांची धडक; मॅनेजरला बेड्या, वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा भांडाफोड
पुणे :- शहरातील मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. Pune massage Parlour गुलटेकडी परिसरातील एका ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’वर छापा टाकून पोलिसांनी सहा पीडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे शहरात गुपचूप सुरू असलेल्या गैरकृत्यांचे जाळे उघडकीस आले असून, पोलिसांनी मॅनेजर महिलेला अटक केली आहे. Pune Police Latest Crime News
पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला (AHTU) गुप्त माहिती मिळाली होती की, गुलटेकडी परिसरात ‘वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर’ या नावाने मसाजचा व्यवसाय सुरू आहे, पण त्याच्या आड वेश्याव्यवसाय चालतो. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईचा आराखडा तयार केला. Pune Police Busted Sex Racket
पोलिसांची धडक कारवाई
23 सप्टेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने स्वारगेट पोलिसांच्या मदतीने ‘वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर’वर छापा टाकला. पोलिसांची टीम आत शिरताच तिथे सुरू असलेला प्रकार उघड झाला. पोलिसांनी त्वरित तिथे असलेल्या सहा पीडित महिलांना सुरक्षित बाहेर काढले. या व्यवसायाची मॅनेजर वैशाली रंगनाथ विस्पुते (वय 31) हिला पोलिसांनी जागेवरच अटक केली.
या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात Swargate Police Station भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरातील अशा गैरकृत्यांना आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. Pune Police Latest News



