
Pune Crime Branch Busted Sex Racket : स्प्रिंग ब्रुक लॉज,गुन्हे शाखेच्या छाप्यात लॉजच्या मॅनेजरसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे :- पुणे कल्याणी नगर परिसरात एका स्प्रिंग ब्रुक लॉज, सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर येरवडा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या Yerwada Police Crime Branch पथकाने छापा टाकला. महिलेला पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी लाॅज मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. Pune Kalyani Nagar Sex Racket एका आरोपी याप्रकरणी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अमोल भाऊसाहेब तांबडे (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी बंटी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्यापही तो फरार आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामेश्वर दशरथ नवले (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांच्या पथकाने लाॅजवर छापा टाकला. पोलिसांनी लाॅजमधून एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत लाॅजचा मॅनेजर अमोल भाऊसाहेब तांबडे आणि त्याच्या साथीदार बंटी हा महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवयायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लाॅज मॅनेजर याला ताब्यात घेऊन अटक केली. येरवडा पोलीस ठाण्यात Yerwada Police Station त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सांवत पुढील तपास करत आहेत.