
Pune Breaking News : पुण्याच्या बावधन जवळील सुसरोड येथील एका प्रसिद्ध खाजगी शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी असलेला मेल मिळाल्यानंतर शाळेची तपासणी करण्यात आली., घटनास्थळी तातडीने पोलीस पथक आणि बॉम्बशोधक पथक यांच्याकडून शाळेची तपासणी
पुणे :- आज गुरुवारी (13 फेब्रुवारी) सकाळी बावधन जवळील सुस रोड येथील एका खाजगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल प्राप्त झाला होता. Pune Bomb Threat मेल आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ पोलिसांची Pune Police संपर्क साधून घटनास्थळी बॉम्बशोधक पथक उपस्थित झाले. त्यांनी संपूर्ण शाळेची पाहणी करून कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नसून केवळ अफवा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, पोलिसांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
सुस रोडवर ही शाळा असून या शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित झोनमध्ये नेऊन शाळेची तपासणी केली. मात्र काहीही न वाढवल्याने हा कोणीतरी खोडसायपणा केला असावा असा पोलिसांकून अंदाज व्यक्त केला जात आहे.तरी हा मेल कोणी पाठवला, कुठून आला, याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.