क्राईम न्यूजपुणे

Pune Robbery News : विश्रांतीवाडी पोलीस पथकाची धडक कारवाई ; दोन भावांना अटक, दोघेही भाऊ सराईत चोर

Pune Robbery. News : 19 लॅपटॉप, 63 मोबाईल फोन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, दोघे भाऊ सराईत चोर

पुणे :- विश्रांतवाडी पोलिसांच्या गुन्हे तपास पथकाने मोठी कारवाई करत दोन सराईत भावांना अटक केली आहे. दोघेही भाऊ सराई चोर असून त्यांच्याकडून 19 लॅपटॉप आणि 63 मोबाईल फोन पाच डिजिटल घड्याळ असे एकूण 31 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपींच्या विरोधात एकूण नऊ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पोलिसांनी तपासात सर्व गुन्हे उघडकीस आणले आहे. Pune Crime News

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना त्यातील संजय बादरे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. धानोरी रोड येथे पाण्याचे खादनी काम जवळ असलेल्या भिम नगर झोपडपट्टीत दोन व्यक्ती थांबले आहे त्यांच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग असून काही संशयित वस्तू आहे असे पोलिसांना खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलीस अधिकारी नितीन राठोड आणि त्यांच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून दोन आरोपींना अटक केली पोलिसांनी त्यांच्या बॅगचे धरती घेतली असता चार लॅपटॉप आणि सात मोबाईल फोन मिळून आले तसेच त्या सर्व मोबाईल फोन बाबत विश्रांती वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून ते दोन्ही आरोपी आंध्र प्रदेश या राज्यातील आहे. पोलिसांनी बाबू राम मूर्ती बोयर (29 वर्ष), सुरेश राममूर्ती बोयर (24 वर्ष) दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी लोणी काळभोर तालुका हवेली पुणे येथे त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता पोलिसांना एकूण 19 लॅपटॉप 63 मोबाईल फोन पाच डिजिटल घड्याळ असे एकूण 31 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना सापडला. पोलिसांनी ते सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपींच्या विरोधात विश्रांतवाडी (2गुन्हे), विमानतळ (1गुन्हे), लोणीकंद (3गुन्हे), दिघी (1गुन्हा), भोसरी (1गुन्हा) या प्रमाणे एकुण 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. Pune Crime News

पोलीस पथक

मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 4. पुणे शहर, आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, वामन सार्पत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, शेखर खराडे, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांचे पथकाने केली आहे. Pune Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0