Pune Red light area | बुधवार पेठेत रस्त्यावर थांबून अश्लील हातवारे करणाऱ्या महिलांविरुद्ध ‘पिटा’ कारवाई
- व्यापाऱ्यांना त्रास झाल्याने फरासखाना पोलिसांची कारवाई
पुणे, दि. ४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर :
Pune Red light area | पुण्यातील बुधवार पेठ आंबट शौकिनांसाठी प्रसिद्ध आहे. आंबट शौकिनांचा लाड पुरविणाऱ्यासाठी त्यांना अश्लील हातवारे करणे आणि लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणे येथे खुलेआम सुरूच असते. आता येथील व्यापाऱ्यांना याचा त्रास होत असल्याने याची दखल फरासखाना पोलिसांनी घेतली आहे. रस्त्यावर अश्लील हातवारे करणाऱ्या व वेश्याव्यवसाय prostitution करणाऱ्या महिलांविरुद्ध ‘पिटा’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. Pune Red light area
याबाबत पोलीस शिपाई अविनाश ओव्हाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महिला रूपा समद, देविका लमाणी, चायना मोंडल यांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात Faraskhana Police Station पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनी मंदिरासमोर सार्वजनिक रस्त्यावर बुधवार पेठ येथे काही महिला रस्त्यावर उभे राहून अश्लील हातवारे करून वेश्या व्यवसायासाठी थांबत असल्याची तक्रार येथील व्यापारी करत होते. याची दखल घेत फरासखाना पोलिसांनी धडक कारवाई करत महिलांना ताब्यात घेतले. महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे कंडोम आढळून आले.