Pune Rape News : स्वारगेट बस स्थानक येथे शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार

Pune Swargate Rape News : पुण्यावरून फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे
पुणे :- स्वारगेट हे पुण्यातील गजबजलेल्या एसटी मंडळाच्या बस डेपो पैकी एक असल्याचे पाहायला मिळते. परंतु, याच स्वारगेट बस डेपो मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Pune Swargate Rape News एका 26 वर्षीय तरुणीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर संपूर्ण पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यादरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला.बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला. तरुणीने मित्राला फोनवर सांगितला प्रकार या धक्कादायक घटनेनंतर तरुणी फलटणला जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. बसमध्ये बसल्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. स्वारगेट पोलीस ठाण्यात Swargate Police Station पीडीतेने आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून या नराधमाचा शोध घेतला जात आहे. पोलीस संपूर्ण बस स्टॅन्ड मधील सीसीटीव्ही फुटेजचे तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.