Pune Railway Station News : पुणे रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई

Pune Railway Station Latest Crime News : ५१ लाख रुपयांसह संशयित व्यक्ती पकडला
पुणे | 20 सप्टेंबर 2025 रेल सुरक्षा बल (आरपीएफ) स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे स्थानकावर राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन सतर्क” या विशेष मोहिमेदरम्यान आज मोठी कारवाई करण्यात आली. सतर्कता तपासणीदरम्यान फरदीनखान जफरउल्ला खान मोगल (वय 24, रहिवासी मेहसाणा, गुजरात) या युवकाला तब्बल ₹51 लाख रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले. Pune Latest Crime News
कारवाईचे तपशील
आरपीएफच्या नियमित सामान तपासणीसाठी लावलेल्या Baggage Scanner Machine वर हा प्रवासी संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करण्यात आली.
त्याच्याकडे असलेल्या दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली—
बैंगणी रंगाची बॅग : अंदाजे ₹22 लाख
लाल रंगाची बॅग : अंदाजे ₹29 लाख
पैशांबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने रोख रक्कम व व्यक्तीला आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी विभागाकडून सुरू आहे.
पथकाची कामगिरी
ही कारवाई आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभाये, एएसआय विलास दराडे, एएसआय संतोष पवार तसेच एमएसएफ कर्मचारी कृष्णा भांगे यांनी यशस्वीरीत्या केली.


