Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या आजोबांना अटक, चालकाला धमकावल्याचा आरोप
•पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते की, कार अल्पवयीन व्यक्ती चालवत नव्हता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी अल्पवयीन तरुणांच्या आजोबाला अटक केली आहे.
पुणे :- पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवाल याने ड्रायव्हरला धमकावले आणि त्याला घरी जाऊ दिले नाही.चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कलम 365, 366 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवालने यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. या चौकशीत आजोबांनी कारची चावी दिल्याची कबुली दिली होती. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले असून त्याचे वडिल विशाल अग्रवाल यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काल या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कारवाई करण्यात आली.आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांची सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.