पुणे

Pune Police Transfer List : पुणे पोलीस दलात मोठा फेरफार! सहा उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल

सौरभ त्रिपाठी यांना परिमंडळ-2 ची जबाबदारी; हिम्मत जाधव यांची बदली

पुणे | पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत मोठा फेरबदल करण्यात आला असून, एकूण 6 पोलीस उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश जाहीर करताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या झाल्या?

1.डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली विशेष शाखा येथून परिमंडळ-2 मध्ये करण्यात आली आहे.

2.हिम्मत जाधव यांना परिमंडळ-4 येथून हलवून परिमंडळ-2 मध्ये पाठवण्यात आले आहे.

3.डॉ. संदीप भाजीभाकरे यांना वाहतूक शाखेवरून हलवून परिमंडळ-4 मध्ये नियुक्त करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, दुसऱ्या आदेशात,

1.राजलक्ष्मी शिवणकर यांची बदली रा.रा. पोलीस बल, बडोदा येथून मुख्यालय, पुणे शहर येथे झाली आहे.

2.कृषिकेश रावले यांची सिंधुदुर्ग येथून परिमंडळ-3, पुणे येथे नियुक्ती झाली आहे.

3.सोमय मुंडे यांना छत्रपती संभाजीनगर येथून परिमंडळ-4, पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे.

या बदल्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तुरित कार्यभार स्वीकारून, त्याचे प्रमाणपत्र मुख्यालयात सादर करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.या आदेशांमुळे पुणे पोलिस दलात प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0