पुणे

Pune Police : धबधबा वाढला… जीव अडकला… पण ‘खाकी’ धावली!

स्वतःचा जीव धोक्यात घालून खराडी पोलिसांची शौर्यगाथा; क्षणोक्षणीचा थरार

पुणे :- जीव धोक्यात… चारही बाजूंनी नदीचा रौद्ररूप… आणि मृत्यू फक्त काही मीटर अंतरावर! पण अशा क्षणी खराडी पोलिसांनी जो पराक्रम केला, त्याला ‘धाडस’ म्हणणं पुरेसं ठरणार नाही — तो एक शौर्यप्रसंग ठरला!

गुरुवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता मुळा-मुठा नदीवर पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती मिळाल्यावर सपोनि खांडेकर व पथक तात्काळ घटनास्थळी गेले. केशवनगर मार्गावरील बंधाऱ्यावर पोहचताच, त्यांना एक इसम मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकलेला दिसला. पाहता पाहता पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत गेला आणि त्याचा जीव अक्षरशः तासाच्या काट्यावर येऊन ठेपला!

मुळामुठेच्या पुरात वाहू पाहणाऱ्या पोलिसांनी मानवी साखळीने दिलं जीवनदान फायर ब्रिगेडला माहिती दिली असली तरी, वेळ कमी होता आणि धोका मोठा! तेव्हा खराडी पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता दोरी घेऊन मानवी साखळी तयार केली. सपोनि खांडेकर, अंमलदार दोरगे, सय्यद, गायकवाड, महिला अंमलदार थोरात, मालवंडे, साळके व काळे यांनी पाण्याच्या प्रवाहात उतरून नवाज खुर्शीद कोतवाल (वय 38, रा. तुकाराम नगर) याला बाहेर ओढलं आणि मृत्यूच्या दारातून परत आणलं.

घटनास्थळावरील रस्ता तत्काळ बंद करण्यात आला असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. खराडी पोलिसांच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि पराक्रमामुळे एक निरपराध जीव वाचला आणि समाजात खाकी वर्दीबद्दलचा विश्वास अधिक घट्ट झाला!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0