Pune Police | पुण्यात सामाजिक सुरक्षा विभागाकडे ‘कानाडोळा’ : ‘वजनदार’ विभाग ‘सुस्तावले’
दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक जागा रिक्तच?
- गुन्हे शाखेतील ‘वजनदार’ सामाजिक सुरक्षा विभाग ‘सुस्तावले’
- पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने ‘पिटा’ कारवाया थांबल्या
पुणे, दि. २६ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Police
Pune Police पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडील ‘वजनदार’ समजल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे ‘कानाडोळा’ होत असल्याची खमंग चर्चा आहे. दोन महिन्यापासून पोलीस निरीक्षक यांची जागा रिक्त असल्याने सामाजिक सुरक्षा विभाग ‘सुस्तावले’ आहे. पोलीस आयुक्तालयात ‘वजनदार’ समजल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात चर्चाना उधाण आले आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग Social Security Cell वपोनि भरत जाधव Bharat Jadhav नियत वयोमानानुसार ३१ मे २०२४ रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अद्याप दुसऱ्या अधिकाऱ्याला नियुक्ती करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजते.
पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नसल्याने ‘पिटा’ कारवाया थांबल्या !
पुणे शहरात ‘स्पा’ च्या आड अवैध धंदे फोफावले असून सामाजिक सुरक्षा विभागात वपोनि Police Inspector जागा रिक्त असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेतील Crime Branch, Unit युनिट आता अवैध धंद्यावर कारवाईसाठी सरसावले आहेत.