Pune Police Save Life : पुणे पोलीस उपायुक्त डॉ. भाजीभाकरे यांच्या प्रसंगावधानाने तरुणाचं जीव वाचला
- जगताप डेअरी चौकात अपघात अन पोलीस उपायुक्तांचे प्रसंगावधान | Pune Police Save Life
पुणे, दि. २४ डिसेंबर, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
पुणे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे (DCP Dr.Sandeep Bhajibhakre) यांच्या प्रसंगावधानाने तरुणाचे जीव वाचले आहे. पोलीस उपायुक्तांकडून समयसुचकता दाखविण्यात आल्याने अपघाताच्या धक्क्याने फिट आलेल्या तरुणाला प्रथमोपचार मिळाले. पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या कृतीने पुणेकर नागरिकांमध्ये पुणे पोलीस दलाविषयी अभिमान निर्माण झाला आहे. Pune Police Save Life
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे वानवडी हद्दीतील जगताप डेअरी चौकातून जात असताना त्यांच्या समोरच एक विचित्र अपघात झाला यात एका दुचाकीस्वार तरुणाने एका वयस्क आजीला धडक दिली. यात वयस्क महिला किरकोळ जखमी झाली परंतु दुचाकीवरून कोसळल्याने तरुणाला अचानक फिट आली. पोलीस उपायुक्तांच्या डोळ्यादेखत सगळं घडत असताना त्यांनी प्रसंगावधान दाखवत तरुणाला फिट आल्याचे ओळखून त्यास प्रथमोपचार देण्यास सुरुवात केली. तसेच वयस्क महिलेला देखील रक्तस्त्राव होत असताना रक्त थांबविण्यासाठी स्वतःचे हातरुमाल बांधून रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. Pune Police Save Life
पोलीस उपायुक्तांच्या कृतीचे नागरिकांनी अभिनंदन करत त्यांच्या कार्यास सलामी दिली.
याबाबत महाराष्ट्र मिररला माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले कि, हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. नागरिकांनी देखील अपघात समयी अपघातग्रस्तांना मदतीला पुढे यावे. आपल्या समयसूचकतेमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. असे आवाहन देखील केले.